आदिवासी विकास विभागांतर्गत रोजराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

योजेनेचा उद्देशः
1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील 18 ते 45 या कार्यप्रवण वयोगटातील
उमेदवारांसाठी विविध रोजगाराभिमुख कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, आणि
त्यामाध्यमातुन आदिवासी समुदायातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर रोजगार व
स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे.
2. आदिवासी उमेदवारांना स्थानिक गरजा, साधनसामुग्री, परिसरातील रोजगार व स्वरोजगारास
असलेला वाव इत्यादी बाबींशी निगडीत कौशल्य विकास प्रशिक्षण देणे.
3. आदिवासी युवक-युवतींना कौशल्य प्रदान करुन रोजगार व स्वयंरोजगारास पात्र बनविणे.

लक्षगटः

    1. अनुसूचित जमातीतील 18 ते 45 वयोगटातील युवक/युवती.
    2. त्यापैकी रोजगारासाठी स्थलांतर करणारे आदिवासी व्यक्ती, अल्पशिक्षित, बेरोजगार,
    अर्धवट शिक्षण झालेले आदिवासी युवक- युवती.

प्रशिक्षणार्थी पात्रताः

1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक/युवती.
2. प्रशिक्षणार्थींने मान्यता प्राप्त योजना अभ्यासक्रमात नमुद शैक्षणिक पात्रता धारण केलेली
असणे बंधनकारक राहील.

Download GR

श्री. एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
डॉ. विजयकुमार गावित माननीय मंत्री, आदिवासी विकास विभाग
श्री. विजय वाघमारे ( भा.प्र.से ) सचिव, आदिवासी विकास विभाग,नाशिक
श्रीमती लीना बनसोड भा.प्र.से. माननीय व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक